पंचकर्म म्हणजे शरिरशुद्धी (Body Detoxification) शरीरातील अशुद्ध, विकृत, अनावश्यक गोष्टी विविध क्रियेद्वारे बाहेर काढणे, म्हणजेच पंचकर्म होय.
पंचकर्म कशासाठी व कुणासाठी?
निरोगी व्यक्तींसाठी: निरोगी व्यक्तींनी, दिर्घायुष्य प्राप्तीसाठी व तारूण्य चिरकाळ टिकविण्यासाठी वर्षातुन किमान एकदा तरी पंचकर्माने शरीर शुध्दी करून तदनंतर च्यवनप्राशादी रसायनांच्या सेवनाने निश्चितच निरोगी व आनंददायी जीवन जगता येते.
आजारी व्यक्तींसाठी: आजार एकदा जुना झाला कि, नंतर त्या रूग्णांना त्वरित ठीक करण्यास पंचकर्माची आवश्यकता असते. योग्य पंचकर्म उपचार व पथ्याने आजार पूर्ण बरा करता येतो.
पंचकर्माकरीता सर्वोत्तम ऋतू
वसंत ऋतू म्हणजे उन्हाळ्याची सुरवात असते. चुकीच्या खान्यापिण्याच्या सवयीमुळे, पचन विघडून, अर्जीणामुळेच ( पचनशक्ती मंदावल्यामुळे ) आजार होतात असे आयुर्वेद सांगतो.
अनावश्यक घाण ( TOXINS ) शरीरातील कमजोर भागामध्ये साचायला लागतात. शरीर कमजोर झाल्यावर ती घाण तशीच साचून राहणे, हे आजार वाढण्यास कारणीभूत ठरते.
अशाप्रकारचे Toxins शरीराबाहेर काढण्यास आयुर्वेदामध्ये पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी सांगितलेली आहे. ज्याप्रमाणे आपण गाड्यांची Servicing करतो त्याप्रकारे शरीरा ची शुद्धी म्हणजे पंचकर्म होय. दिर्घायुषी व निरोगी जीवना करिता प्रत्येकाने वर्षातून स्वतःकरिता वेळ काढून आयुर्वेदिय पंचकर्म केल्यास आपण विविध प्रकारच्या आजारांपासून वाचू शकतो व आपली रोग प्रतिकार शक्ती वाढून, वारंवार आजारी पडण्याची प्रवृत्ती कमी होते.